बारावीचा निकाल 91.25 टक्के:मुलींचा निकाल मुलांपेक्षा 4.59 टक्के जास्त, 23 विषयांचा निकाल 100 टक्के
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. तर दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी 2 वाजता ऑनलाइन पाहता येणार असल्याची माहिती, राज्य बोर्डाकडून देण्यात आली आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी, मार्च 2023 दरम्यान इयत्ता बारावीची परीक्षा राज्यातील नऊ विभागीय मंडळांच्या मार्फत घेण्यात आली होती. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती आणि कोकण अशा नऊ विभागात राज्यभरातून 12 लाखांवर विद्यार्थी बसले होते.
विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण संकेतस्थळांवर उपलब्ध होतील. तसेच त्यांची प्रिंट घेता येईल.
कोणत्या विभागाचा किती निकाल?
कोकण विभाग - सर्वाधिक 96.01 टक्के
मुंबई विभाग - सर्वात कमी 88.13 टक्के
पुणे विभाग - 93.34 टक्के
नागपूर विभाग - 90.35 टक्के
औरंगाबाद विभाग - 91.85टक्के
कोल्हापूर विभाग - 93.28 टक्के
अमरावती विभाग - 92.75 टक्के
नाशिक विभाग - 91.66 टक्के
लातूर विभाग - 90.37 टक्के
मुलींचा निकाल मुलांपेक्षा 4.59 टक्के जास्त
राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी, मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.73 टक्के तर मुलांचा निकाल 89.14 टक्के लागला आहे. म्हणजेच मुलींचा निकाल मुलांपेक्षा 4.59 टक्के जास्त लागला आहे.
23 विषयांचा निकाल 100 टक्के
154 विषयांपैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. बारावीची परीक्षा एकूण 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
*खालील संकेतस्थळावर पाहा निकाल*
mahresult.nic.in
https://hsc.mahresults.org.in https://hscresult.mkcl.org
https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023
👩💻 *तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा लाखो लोकांच्या WhatsApp वर ! संपर्क 👉 - 9881517171*
➖➖➖➖➖➖➖➖➖
🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - जॉईन व्हा* 👉
https://chat.whatsapp.com/HWDvOIAzp5s6CaOO9kWOux
0 टिप्पण्या