Header Ads Widget

एकात्मिक पाठ्यपुस्तकांसंदर्भात विद्यार्थी / पालक / शिक्षक/शाळा इत्यादींसाठी सूचना

 

एकात्मिक पाठ्यपुस्तकांसंदर्भात विद्यार्थी / पालक / शिक्षक/शाळा इत्यादींसाठी सूचना


महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ 'बालभारती', सेनापती बापट मार्ग, पुणे ४११००४.


शालेय वर्ष २०२३-२४ साठी खालीलप्रमाणे दोन प्रकारची पाठ्यपुस्तके खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.


1.


इयत्ता १ ली ते ८ वी साठी असणारी विषयवार नियमित स्वतंत्र पाठ्यपुस्तके.


(सर्व माध्यमांची मराठी, इंग्रजी, हिंदी इ., तसेच गणित, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल इ.) 1. इयत्ता १ ली ते ८ वी साठी एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती या शीर्षकाची एकूण चार भागातील सर्व विषय एकत्र करून तयार केलेली (पथदर्शी प्रकल्प) पाठ्यपुस्तके.


• वरील दोन्ही प्रकारच्या पाठ्यपुस्तकांच्या आशयामध्ये कोणताही फरक नाही.


• दोन्ही प्रकारच्या पाठ्यपुस्तकांचा आशय समान असल्याने मूल्यमापन योजना समान आहे.


• दोन्ही प्रकारची पाठ्यपुस्तके प्रचलित अभ्यासक्रमावर आधारित आहेत. • नव्याने तयार केलेल्या एकात्मिक पाठ्यपुस्तकांमध्ये पाठ्यघटकानंतर विद्यार्थ्यांना नोंदी घेण्यासाठी 'माझी नोंद' म्हणून वहीच्या पृष्ठांचा समावेश केलेला आहे.


• खुल्या बाजारातील विषयवार स्वतंत्र पाठ्यपुस्तकांची किंमत एकात्मिक पाठ्यपुस्तकांपेक्षा


कमी आहे.


• खुल्या बाजारात विक्रीस उपलब्ध असलेल्या दोन्ही प्रकारच्या पाठ्यपुस्तकांपैकी कोणत्याही एका विशिष्ट पाठ्यपुस्तकाचा वापर करावा, अशी सक्ती शिक्षक, मुख्याध्यापक व इतर कोणत्याही घटकाने पालक वा विद्यार्थी यांना करू नये.


• खुल्या बाजारात दोन्ही प्रकारची पाठ्यपुस्तके उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना यांपैकी कोणत्याही प्रकारचे पाठ्यपुस्तक निवडण्याचे स्वातंत्र्य आहे.


पाठ्यपुस्तकांची रचना व बदलांबाबतची नोंद राज्यातील इ. १ ली ते ८ वीच्या सर्व विद्यार्थी / पालक/ शिक्षक/ मुख्याध्यापक यांनी तसेच सर्व शैक्षणिक संस्था, पुस्तक विक्रेते व इतर सर्व संबंधितांनी घ्यावी.


संचालक


पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे ४.


वरील सूचना इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषांसह मंडळाच्या www.ebalbharati.in या वेबसाईटवर व सोबतच्या क्यू आर कोडवर उपलब्ध आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या