Header Ads Widget

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग | National Commission For Protection Of Child Rights

 राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग


National Commission For Protection Of Child Rights



स्थापना- राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम, २००५ अंतर्गत ५ मार्च २००७ रोजी करण्यात आली.


बालकांच्या घटनात्मक कायदेशीर हक्कांचे संरक्षण अंमलबजावणी करणे. तसेच बालकांविषयक धोरणांची व कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे हे आयोगाचे मुख्य कार्य आहे.


राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग (National Commission for Protection of Child Rights

- NCPCR) ही एक वैधानिक संस्था आहे.


आयोगाची रचना

(१) आयोगामध्ये एक अध्यक्ष व ६ सदस्य असतात.

(२) ६ सदस्यांपैकी कमीत कमी २ महिला सदस्य असल्या पाहिजे.

(३) बालकल्याण क्षेत्रात मौत्रिक योगदान दिलेल्या व्यक्तीची अध्यक्षपदी नेमणूक केली जाते.

 (४) ६ सदस्य हे शिक्षण, बालआरोग्य, समाजकार्य क्षेत्रातील नेमले जातात.

नेमणूक - केंद्र सरकारद्वारे, मंत्री MWCD यांचे अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय समितीच्या शिफारशीने


मुख्यालय दिल्ली


कार्ये-

1) बालहक्क संरक्षणावर परिणाम करणाऱ्या कायदयांचे व सुरक्षा उपायांचे परीक्षण व प्रभावी अंमलबजावणीसाठी सल्ला देणे.

(2) सुरक्षा उपायांबाबत वार्षिक किंवा सांगेल त्या वेळी अहवाल केंद्र सरकारला सादर करणे...

(3) बालहक्क भंगाची चौकशी करून कारवाई करण्याचा सल्ला देणे. (4) अन्यायग्रस्त बालकांना बाल हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या घटकांचे परीक्षण करणे व उपाययोजना सुचविणे. 

(5) विशेष काळजीची गरज असणाऱ्या मुलांच्या प्रकरणात लक्ष घालून योग्य उपाययोजना सुचविणे.

(6) आंतरराष्ट्रीय करार व साधनांचा अभ्यास करून आणि धोरण व कार्यक्रमाचे पुनर्विलोकन करून चांगल्या अमलबजावणीसाठी उपाययोजना सुचविणे.


(7) बालहक्काच्या क्षेत्रात संशोधन करणे.


(8) समाजात बालहक्क साक्षरता पसरवणे व जागृती करणे.


(9) बालगृहे व बालसुधारगृहांची पाहणी करणे, सुधारणा सुचविणे. (10) खालील तक्रारीबाबत चौकशी करून स्वतःहून कृती करणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या